Art of Living : ‘हर घर ध्यान’ मध्ये प्रिन्सचे विद्यार्थ्यांसह शिक्षक तल्लीन

Art of Living : ‘हर घर ध्यान’ मध्ये प्रिन्सचे विद्यार्थ्यांसह शिक्षक तल्लीन 

सेलूतील श्रीराम प्रतिष्ठान कार्यक्रम : साध्वी नित्याबोधिनी यांनी केले मार्गदर्शन

सेलू : आर्ट ऑफ लिविंग बेंगलोरच्या साध्वी नित्याबोधिनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश स्कूल विद्याविहार संकुल परिरसरात ‘हर घर ध्यान’ उपक्रम विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. 
याप्रसंगी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, प्रमुख पाहुण्या साध्वी नित्याबोधिनी , प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, पी.नीलकंठ, किशोर घडे, प्रकाश छाचडीया आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी साध्वी नित्याबोधिनी यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योगाबद्दल मार्गदर्शन केले. ध्यानधारणा व त्यापासून होणारे फायदे, महत्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. ध्यानधारणा हे एक अतिमहत्त्वाचे कार्य योगामध्ये आहे. दररोज सकाळी नियमाने ध्यानधारणा केली, तर अभ्यासामध्ये गुणवत्ता वाढेल. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होते. बुद्धीस चालना मिळते, मानसिक ताणतणाव कमी होतो, शारीरिक व मानसिक सर्वप्रकारचे फायदे ध्यान धारणेमुळे होतात, असे सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्याकडून ध्यानधारणा व योगासने करून घेतली. सूत्रसंचालन प्रा.अजिज यांनी केले. दुर्गा चव्हाण यांनी आभार मानले.

Art of Living : 'हर घर ध्यान' मध्ये प्रिन्सचे विद्यार्थ्यांसह शिक्षक तल्लीन; 


शासन आपल्या दारी : परभणीमध्ये विविध कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!