आमदार बोर्डीकरांच्या संवाद मेळाव्याला तेलंगणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार बोर्डीकरांच्या संवाद मेळाव्याला तेलंगणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू जि.परभणी : भारतीय जनता पक्षाच्या आमदार प्रवास अभियानांतर्गत जिंतूर-सेलूच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या तेलंगणामधील मेडचाल विधानसभा मतदारसंघातील संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आमदार बोर्डीकरांवर मेडचाल विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. १९ ऑगस्टपासून बोर्डीकर यांनी नऊ मंडळातील बैठका व मेळाव्याद्वारे भारतीय जनता पक्षाचे नेते, दलित आघाडी, ओबीसी आघाडी, किसान मोर्चाचे पदाधिकारी शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यांच्यासह नागरिकांशी संवाद साधला आहे. याद्वारे पक्षाची परिस्थिती समजून घेतली असून, आगामी विधानसभेच्या दृष्टीने भाजप उमेदवाराला ताकद मिळावी यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. या दरम्यान, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, शेतकरी, महिला यांचीही भेट घेऊन संवाद साधला आहे. पद्मश्री सीव्हीआर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांनी सीबीआर तंत्रज्ञानाची माहिती घेतली प्रसिद्ध एदलाबाद येथील रंगनायक स्वामी मंदिरात आणि केसरा इथल्या रामलिंग भगवान शंकराचे दर्शन घेऊन त्यांनी अनेक मेळाव्यांना आणि वेगवेगळ्या स्तरातील समाज बांधवांना संबोधित केले आहे. त्यांच्या बैठकांना आणि थेट जनसंपर्कांना उदंड प्रतिसाद मिळत आहे . यावेळी मेडशाचे जिल्हाध्यक्ष विक्रम रेड्डी,ज्येष्ठ नेते मोहन रेड्डी सहित सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातून मेघना बोर्डीकर यांच्यासोबत प्रदेशाचे प्रवक्ते डॉ.उमेश देशमुख आणि प्रदेश भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुरेश भुमरे या दौऱ्यात सोबत आहेत.


शासन आपल्या दारी : परभणीमध्ये विविध कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!