Brahmakumaris : सेलूतील ब्रह्माकुमारी विद्यालयात दहीहंडी उत्सव जल्लोषात

Brahmakumaris : सेलूतील ब्रह्माकुमारी विद्यालयात दहीहंडी उत्सव जल्लोषात

सेलू : येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात‌ गुरुवारी, सात सप्टेंबररोजी सायंकाळी श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी ब्रह्माकुमारी सविता बहेन, राधा बहेन, सारिका बहेन यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी चिमुकल्यांनी राधा कृष्ण, गोपिका वेशभूषा साकारली होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, राधे राधे तेरे बिना, राधा कृष्णा रास, अच्युत्तम केशवम् , मेरी बन्सी बजाओ नंदलाला आदी विविध गीतांवर बालचिमुकल्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अनुष्का बोराडे, नम्रता मिटकरी, स्वरा बरसाले, नम्रता बोराडे, अमुल्या,अवनी, जिजाई मोगल, तक्षशिला, अदिती, अस्मिता मगर, वेदांत मोगल, लोया आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारी परिवार, भाविकांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!