कबड्डीपटुंना करिअरच्या मोठ्या संधी : डॉ.संजय रोडगे; सेलू तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा उत्साहात 

कबड्डीपटुंना करिअरच्या मोठ्या संधी : डॉ.संजय रोडगे; सेलू तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा उत्साहात 

नूतन विद्यालय, प्रिन्स इंग्लिश, नखाते विद्यालय विजयी, ३९ संघाचा सहभाग

प्रो-कबड्डीमुळे मराठमोळ्या कबड्डी खेळाला क्रिकेटप्रमाणे व्यावसायिक ओळख मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कबड्डीपटुंना करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी व्यक्त केले.

सेलू : प्रो-कबड्डीमुळे मराठमोळ्या कबड्डी खेळाला क्रिकेटप्रमाणे व्यावसायिक ओळख मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कबड्डीपटुंना करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी व्यक्त केले.

क्रीडा व युवक सेवासंचालनाय पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी, गटशिक्षणाधिकारी कार्यालय व श्रीराम प्रतिष्ठानच्या संयुक्त सहकार्याने गुरुवारी, सात सप्टेंबररोजी प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. उद्घाटनप्रसंगी डॉ.संजय रोडगे बोलत होते. उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड, प्राचार्य कार्तिक रत्नाला, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, मुख्याध्यापक विजयसिंह राजपूत, मधुकर काष्टे यांची उपस्थिती होती.

आपण एक आहोत, हा विचार सांघिक खेळातून रूजतो व त्याचे पुढे राष्ट्रीय भावनेत रूपांतर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळातून करिअर करावे व देशसेवा करावी, असे उमेश राऊत म्हणाले. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे आतील मुले व मुलींच्या एकूण ३८ संघांनी सहभाग नोंदविला. प्रास्ताविक गणेश माळवे, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर सूरज शिंदे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रो.कबड्डी खेळाडू राहुल घांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

अंतिम फेरी सामन्यात १४ वर्षे मुलाच्या गटात : प्रथम – नूतन विद्यालय, व्दितीय – न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, १४ वर्ष मुली गटात : प्रथम – एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, व्दितीय : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, १७ वर्षे मुले गटात : प्रथम – नूतन विद्यालय, व्दितीय : श्रीमती शांताबाई नखाते आश्रम शाळा, वालूर, १७ वर्षे मुली गटात : प्रथम – श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय, देवगावफाटा, व्दितीय – नूतन कन्या प्रशाला, सेलू, १९ वर्षे मुले : प्रथम – श्रीमती शांताबाई नखाते आश्रम शाळा, वालूर, व्दितीय – एलकेआर रोडगे प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू, १९ वर्षे मुली : प्रथम – एलकेआर रोडगे प्रिंन्स इंग्लिश स्कूल सेलू, व्दितीय – न्यू हायस्कुल सेलू. पंच म्हणून प्रशांत नाईक, राजेश राठोड, सगीर फारोकी, शुभम पवार, राहुल घांडगे. प्रो-कबड्डी राष्ट्रीय खेळाडू विशाल ढवळे, वेदांत बोचरे, बबलु घांडगे, ज्ञानदीप घांडगे, गोविंद झमरे यांनी काम पाहिले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!