मराठा समाजाच्या वतीने शिराळा येथे लाक्षणिक उपोषण; जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा
सेलू : जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथील मराठा आंदोलकावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून सेलू तालुक्यातील शिराळा गावातील मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी, आठ सप्टेंबररोजी लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली. या वेळी योगेश खेडेकर, सोपान खेडेकर, गुलाब खेडेकर, वसंत खेडेकर, वैभव खेडेकर, उद्धव खेडेकर, अविनाश खेडेकर, मनीष खेडेकर, दिलीप खेडेकर, राजेश वायगुंडे, अशोक खेडेकर, उमेश खेडेकर, रामेश्वर खेडेकर, रवि खेडेकर, निळकंठेश्वर खेडेकर, महेश खेडेकर, रामेश्वर शेळके, विष्णु खेडेकर, नितिन खेडेकर, किसनराव खेडेकर, कल्याणराव खेडेकर, संतोष शिंदे, न्यानेश्वर खेडेकर, रामेश्वर खेडेकर, वैजनाथ खेडेकर, महादेव खेडेकर, परमेश्वर खेडेकर, गंगाधर खेडेकर, संतोष खेडेकर, विठ्ठल खेडेकर, सिद्धेश्वर खेडेकर, स्वप्निल खेडेकर आदींसह मराठा बांधव उपस्थित होते
.