सेलूतील श्रीमहेश्वर शिवलिंगाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात; जलाभिषेकासाठी मोठी गर्दी

सेलूतील श्रीमहेश्वर शिवलिंगाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात; जलाभिषेकासाठी मोठी गर्दी

गुरुवारी मुख्य महापूजा झाली. या वेळी बारा ज्योतिर्लिंगांतील तीर्थ व प्रमुख नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक झाला. जलाभिषेकासाठी पंचक्रोशीसह शहरातील भाविकांच्या विशेषत: महिला भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यानिमित्ताने पंधरा ते वीस हजारावर भाविकांना प्रसाद, रुद्राक्ष, विभुती व शिवलीलामृत ग्रंथ वाटप झाले. महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला

सेलूतील श्रीमहेश्वर शिवलिंगाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात; जलाभिषेकासाठी मोठी गर्दी

सेलू जि.परभणी : श्रीमहाबलीपुरम (तामिळनाडू) येथून आणलेल्या श्रीमहेश्वर शिवलिंगाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सेलू (जि.परभणी) येथील श्रीसाईबाबा मंदिरामध्ये उत्साहात पार पडला. जलाभिषेकासाठी गुरुवारी, सात सप्टेंबररोजी शहरासह पंचक्रोशीतील भाविकांची झिमझिम पावसातही मोठी गर्दी केली होती.
यानिमित्ताने मंगळवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. तीन टन वजनाच्या श्रीमहेश्वर शिवलिंगाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुवारी सकाळी वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, सिध्दचैतन्य महाराज, काशिनाथ शिवाचार्य महाराज, विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारात महाअभिषेक झाला. प्रवीण लोया, साईराज बोराडे, प्रभाकर सुरवसे, श्रीनिवास झंवर, बिपीन मंत्री दाम्पत्यांच्या हस्ते महापूजा झाली. कैलासस्वामी थळपती, कैलासस्वामी मिटकर, मनोहरगुरू रत्नपारखी, ओंकारस्वामी, भरत महाराज पठाडे, विजया बोराडे, उर्मिला बोराडे, नयन बोराडे, प्रतीक बोराडे, संतोषगुरू यांची उपस्थिती होती. संतोष महाराज आढवणे, माणिक महाराज रेंगे, शिवा महाराज बावस्कर यांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माऊली महाराज चव्हाण, गजानन महाराज मुंडे, सोपान महाराज चव्हाण, कार्तिक महाराज हिंगणे, कृष्णा महाराज जाधव, नवनाथ महाराज गायकवाड यांनी साथसंगत केली. दरम्यान, गुरुवारी बारा ज्योतिर्लिंगांतील तीर्थ व प्रमुख नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक झाला. यानिमित्ताने वीस हजारावर भाविकांना प्रसाद, रुद्राक्ष, विभुती व शिवलीलामृत ग्रंथ वाटप झाले. महाआरतीने सांगता झाली. सोहळ्यासाठी सेलूकरांसह विनोद बोराडे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

सेलूतील श्रीमहेश्वर शिवलिंगाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात; जलाभिषेकासाठी मोठी गर्दी


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले : योगेश ढवारे शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!