क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले : योगेश ढवारे शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव
सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विदयालयातील उपक्रमशील शिक्षक योगेश ढवारे यांना २०२२-२३ या वर्षातील शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्द्ल राज्य सरकारच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मंगळवारी, पाच सप्टेंबररोजी सन्मानित करण्यात आले. मुंबईत हा सोहळा झाला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख एक लाख १० हजार रूपये आहे, असे आहे.
सेलू जि.परभणी : येथील श्री केशवराज बाबासाहेब विदयालयातील उपक्रमशील शिक्षक योगेश ढवारे यांना २०२२-२३ या वर्षातील शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्द्ल राज्य सरकारच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मंगळवारी, पाच सप्टेंबररोजी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दिपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षक आमदार विक्रम काळे, किरण सरनाईक, कपिल पाटील, शिक्षण व क्रीडा सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक माध्यमिक संपत सूर्यवंशी, शिक्षण संचालक योजना महेश पालकर, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक प्रविण येडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख एक लाख १० हजार रूपये आहे. ढवारे या आधीही दोन वेळा जिल्हास्तरावरून राज्य स्तरीय फेरीसाठी पात्र ठरले होते. पण यावेळी जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रम करून त्यांनी या वर्षी राज्य पुरस्काराला गवसणी घातली. त्यांना विविध ३१ राज्य व दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त आहेत. अध्यापनात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे हा त्यांची आवड आहे. विद्यार्थ्यांना उपक्रमशील व तंत्रज्ञान युक्त तथा कृतियुक्त शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. श्री केशवराज शिष्यवृत्ती परीक्षा पॅटर्न राबवून त्यांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र असुन एकाचा जिल्हा स्तरावर गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. अनेक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित आहेत. तसेच ISBN क्रमांक प्राप्त पाच पुस्तकांचे लेखन, महाराष्ट्र सरकारच्या व्हर्च्युअल क्लासरूम उपक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान, दिक्षा ॲप वर १५ शैक्षणिक व्हिडिओ, स्वतःचे युट्युब चैनल वर ११० पेक्षा जास्त शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती व शैक्षणिक ब्लाँग आहे. एनसीईआरटीच्या व सीसीआरटीच्या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करत आहेत. अखिल भारतीय साने गुरूजी कथामालेचे मराठवाडा सक्रीय कार्यकर्ते आहेत. ढवारे यांच्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक गजानन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिरूद्ध जोशी, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलकर्णी, सचिव महेश खारकर, सदस्य अशोक चामणीकर, अभय सुभेदार, सदस्य जयंत दिग्रसकर, ललित बिनायके, डॉ. प्रवीण जोग, प्रवीण माणकेश्वर,ॲड. किशोर जवळेकर, विष्णू शेरे, मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर व बालासाहेब हळणे आदींनी अभिनंदन केले आहे.
विज्ञान नाट्योत्सव : सेलूतील व्हिजन इंग्लिश स्कूलच्या नाटिकेला प्रथम पारितोषक