सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी जल्लोषात

सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी जल्लोषात

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुरूवारी, सात सप्टेंबररोजी विविध कार्यक्रमांनी दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला.
शाळेच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने राधाकृष्ण वेशभूषा, यशोदानंदन नाटिका, मटकी सजावट स्पर्धा, श्रीकृष्ण पाळणा सजावट आदी कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी
डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमा पूजन झाले. राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धेत क्युरीयस किड्सच्या चिमुकल्यांनी आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सपनो मे आये शाम मुरारी, कृष्ण जन्मला ग बाई, राधे ओ राधे, राधे कृष्णा राधे कृष्णा, ढोलिडा ढोलीडा या गीतांवर नृत्य सादर केले. तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी गाऊ नको रे गाऊ नको रे कृष्णा, राधा माझी राधा माझी या गीतांचे गायन केले. प्रेक्षकांची मने जिकंली. दहीहंडी फोडून केली. प्रिन्स स्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, वस्तीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी व शाळेतील शिक्षकांनी पाच दहीहंडी संगीतमय वातावरणात तीन ते चार थर लावून फोडली.
यावेळी राधे राधे, गोविंदा आला रे आला या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रीना ठाकूर, सूत्रसंचालन मिलिंद खंदारे, व आभार प्रदर्शन विलास शेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले : योगेश ढवारे शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!