रस्ते कामांसाठी सतरा कोटी; सेलू-डिग्रस रस्त्याचा समावेश : आमदार मेघना बोर्डीकर
सेलू जि.परभणी : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन अंतर्गत सेलू, जिंतूर तालुक्यातील रस्ते कामांसाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बुधवारी, सहा सप्टेंबररोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान, या कामांमध्ये सेलू ते डिग्रस जहांगीर या रस्त्याच्या कामासाठी ४२६ लाख रूपयांचा निध सरकाने मंदूर केला आहे.
जिंतूर आणि सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुर्दशा लक्षात घेता आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. मंजूर निधीमुळे मतदारसंघातील एकही रस्ता डांबरीकरण शिवाय शिल्लक राहणार नसून ग्रामीण भागातील जनतेला दळणवळणासाठी मदतच होणार असल्याचे आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.
या रस्त्यांना निधी मंजूर : प्रमुख जिल्हा मार्ग आठ ते टाकळखोपा श्रीरामवाडी ते जिल्हा सरहद रस्ता : 615 लाख रुपये, इतर जिल्हा मार्ग 6 ते गडदगव्हाण रस्ता : 120 लाख रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग 27 ते देऊळगाव गात खवणे पिंपरी ते तालुका सरहद्द रस्ता : 522 लाख रुपये, सेलू ते डिग्रस जहांगीर रस्ता ग्रामीण मार्ग 63 : 426 लाख रुपये
NASA : सेलूच्या ‘तेजश्री’ची उत्तुंग झेप; अंतराळ संशोधन प्रशिक्षणासाठी जाणार अमेरिकेला