NASA : सेलूच्या ‘तेजश्री’ची उत्तुंग झेप; अंतराळ संशोधन प्रशिक्षणासाठी जाणार अमेरिकेला

NASA : सेलूच्या ‘तेजश्री’ची उत्तुंग झेप; अंतराळ संशोधन प्रशिक्षणासाठी जाणार अमेरिकेला

श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रिन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी, संस्थेकडून सत्कार

NASA : सेलूच्या 'तेजश्री'ची उत्तुंग झेप; अंतराळ संशोधन प्रशिक्षणासाठी जाणार अमेरिकेला

आजी-आजोबा, आई-वडील आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. शास्त्रज्ञ होऊन संशोधनात देशाचे नाव मोठे करायचे आहे. – तेजश्री चौधरी, प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू जि.परभणी

परभणी : सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता सहावीतील तेजश्री महेशकुमार चौधरी या विद्यार्थिनीची अमेरिकेतील नासा संशोधन केंद्राच्या आठ दिवसांच्या प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. अंतराळ संशोधन करण्याची संधी तेजश्रीला मिळणार आहे.
यानिमित्ताने श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते तेजश्री व पालकांचा नुकताच सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सचिव डॉ.सविता रोडगे, महेशकुमार चौधरी, सीमा चौधरी, डॉ.चंदन पाटील, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राध्यापक महादेव साबळे आदींची उपस्थिती होती.
तेजश्रीचे वडील उस्मानपूर (ता.परतूर) जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत, तर आई सीमा गृहिणी आहेत. तेजश्रीचे तिसरी ते पाचवीपर्यंतचे शिक्षण उस्मानपूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच झाले. तिथेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ती पात्र ठरली. या दरम्यान, नासाच्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर येथील प्रशिक्षण कार्यक्रम निवडीसाठी स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशन आणि सेडोर इंटरनॅशनलद्वारे २६ ऑगस्टरोजी परीक्षा घेण्यात आली होती. गणित, विज्ञान, भूगोल आणि बुद्धिमापनावर आधारित ही परीक्षा आहे. नोव्हेंबर महिन्यात तेजश्री अमेरिकाला रवाना होणार आहेत, असे वडिल महेशकुमार चौधरी यांनी सांगितले.

इयत्ता सहावीतील तेजश्री महेशकुमार चौधरी या विद्यार्थीनीची अमेरिकेतील नासा संशोधन केंद्रातील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. यामुळे श्रीराम प्रतिष्ठान, प्रिन्स इंग्लिश स्कूल व सेलू शहरासह परभणी जिल्ह्याच्या नावलोकिकात भर पडली आहे. – डॉ.संजय रोडगे, अध्यक्ष, श्रीराम प्रतिष्ठान, सेलू


जिंतूर, सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!