Teacher’s Day : क्रांती फाउंडेशनच्या वतीने शिक्षकांचा सत्कार
बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम
सेलू : येथील बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. क्रांती फाउंडेशनच्या वतीने प्राचार्य एन.पी.पाटील व शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. फाउंडेशनच्या अध्यक्ष पोर्णिमा जोहीरे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. ईक्कर यांनी आभार मानले.