Teacher’s Day : शिक्षक पुरस्कारांचे वितरण; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम
परभणीचे डॉ.बापूसाहेब भोसले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडविण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि जडणघडणीत गुरुचा वाटा खूप मोठा असतो. शिक्षक एक आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम करीत असतात. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार शिक्षकांनी नाविन्यपूर्ण व कृतीयुक्त शिक्षण पद्धतीवर अधिक भर देण्याची गरज आहे, असे मत श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानमध्ये माजी राष्ट्रपती व शिक्षण तज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन मंगळवारी, पाच सप्टेंबररोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थांतर्गत घटक संस्थेतील शिक्षकांना आदर्श शिक्षक व उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील डॉ.बापूसाहेब जीवनराव भोसले यांना जाहीर करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्रिन्स इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राॅस्पेरस पब्लिक स्कूलच्या प्राचार्य प्रगती क्षीरसागर, क्यूरिअस कीड्सच्या रोझ मॅडम, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, करणसिंग चव्हाण, अपूर्वा पाॅलीटेक्नीक प्रा.अशोक बोडखे, आदित्य अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य प्रा.डॉ.मिनाक्षी रत्नपारखी, डॉ राम रोडगे डी.एड. काॅलेजचे प्राचार्य डॉ.बबन सोनवणे, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे उपप्राचार्य अक्षय बन आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.अशोक बोडखे यानी केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे डॉ.बापुसाहेब जीवनराव भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. या निमित्ताने प्रिन्स इंग्लिश स्कूल मधून आदर्श शिक्षक पुरस्कार सूजाय दास व रिना ठाकुर, तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार आशा गायकवाड व नारायण चौरे यांना, क्यूरिअस किड्स मधून आदर्श शिक्षक पुरस्कार रोझ मॅडम, प्राॅस्पेरस पब्लिक स्कूल मधून आदर्श शिक्षक पुरस्कार दिपा सावंत, तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सारिका ताठे, फीन किड्स मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रतिभा कडभाने, ज्ञानतीर्थ विद्यालयामधून आदर्श शिक्षक पुरस्कार सुप्रिया गजभारे, तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार संदिप आकात, जिज्ञासा बालविहार मधून आदर्श शिक्षक पुरस्कार ज्योती शिंदे, अपूर्वा पाॅलीटेक्नीक मधून आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून प्रा. गजानन जाधव, डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालय मधून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. श्रीनिवास कुम्मरवार, आदित्य अध्यापक विद्यालयातून आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून प्रा.डॉ.मिनाक्षी रत्नपारखी यांना प्रदान करण्यात आला. प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले.
भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि जडणघडणीत गुरुचा वाटा खूप मोठा असतो. शिक्षक एक आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम करीत असतात. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार शिक्षकांनी नाविन्यपूर्ण व कृतीयुक्त शिक्षण पद्धतीवर अधिक भर देण्याची गरज आहे, असे मत डॉ.संजय रोडगे यांनी या वेळी व्यक्त केले. शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. डॉ.निलीमा सिंग, अक्षय बन, संदिप आकात, दिपा सावंत, रिना ठाकुर आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी मानले.
या निमित्ताने प्रिन्स इंग्लिश स्कूल मधून आदर्श शिक्षक पुरस्कार सूजाय दास व रिना ठाकुर, तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार आशा गायकवाड व नारायण चौरे यांना, क्यूरिअस किड्स मधून आदर्श शिक्षक पुरस्कार रोझ मॅडम, प्राॅस्पेरस पब्लिक स्कूल मधून आदर्श शिक्षक पुरस्कार दिपा सावंत, तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार सारिका ताठे, फीन किड्स मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रतिभा कडभाने, ज्ञानतीर्थ विद्यालयामधून आदर्श शिक्षक पुरस्कार सुप्रिया गजभारे, तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार संदिप आकात, जिज्ञासा बालविहार मधून आदर्श शिक्षक पुरस्कार ज्योती शिंदे, अपूर्वा पाॅलीटेक्नीक मधून आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून प्रा. गजानन जाधव, डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालय मधून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. श्रीनिवास कुम्मरवार, आदित्य अध्यापक विद्यालयातून आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून प्रा.डॉ.मिनाक्षी रत्नपारखी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
