Teacher’s Day : उज्ज्वला लड्डा, देविदास सोन्नेकर यांचा गौरव ; सेलूतील नूतन विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात
सेलू : येथील नूतन विद्यालयात मंगळवारी, पाच सप्टेंबररोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जेष्ठ शिक्षिका उज्ज्वला लड्डा, डी.डी.सोन्नेकर यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नारायण सोळंके होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आरती पांडव, सहसचिव वैजनाथ मुळे, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, किरण देशपांडे, सत्कारमूर्ती जेष्ठ शिक्षिका उज्ज्वला लड्डा, सतीश भाला, डी.डी.सोन्नेकर, कल्पना सोन्नेकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष लक्ष्मण बागल, मोहसीन अहमद तसेच सतीश जाधव, सुनील गायकवाड, शिवाजी शिंदे यांनीही शिक्षकांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. आरती कदम, गणेश माळवे, आरती पांडव यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. लड्डा व सोन्नेकर यांनी सत्काराला उत्तर देत कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक परसराम कपाटे यांनी केले. सूत्रसंचालन काशिनाथ पल्लेवाड, शिल्पा बरडे, संतोष मलसटवाड यांनी केले. भगवान देवकते यांनी आभार मानले.