दुष्काळ : जिंतूर, सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पिक परिस्थितीची पाहणी
सोयाबीन व तुरीला हेक्टरी २५ हजार, कापसाला ३० हजार, हळद व फळबाग पिकास हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान तातडीने मंजूर करावे, तसेच चालू वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात यावा. चोवीस तास वीज पुरवठा ठेवावा, शेतकऱ्याचे वीज जोडणी तोडण्यात येऊ नयेत. मागील वर्षीचा पिक विमा तसेच २०१८ मधील काही मंडळातील अतिवृष्टीचे थकीत अनुदान तातडीने मंजूर करून वाटप करावे, मागण्या मंजूर न झाल्यास शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा माजी आमदार विजय भांबळे यांनी दिला आहे.
परभणी : पाऊस कमी झाल्याने जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, तूर, हळद, कापूस व इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी सोयाबीन वाळून गेले आहे, तर कापूस, तूर, हळद पिकांनी माना टाकल्या आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने जिंतूर, सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी केली आहे.
जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बुधवारी, ६ सप्टेंबररोजी भांबळे यांनी कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. बामणी, वाघी , हलवीरा आदी ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ऐन फुलांच्या मोसमामध्ये पावसाअभावी सोयाबीन पिकांचे लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन व तुरीला हेक्टरी २५ हजार, कापसाला ३० हजार, हळद व फळबाग पिकास हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान तातडीने मंजूर करावे, तसेच चालू वर्षाचा पीक विमा मंजूर करण्यात यावा. चोवीस तास वीज पुरवठा ठेवावा, शेतकऱ्याचे वीज जोडणी तोडण्यात येऊ नयेत. मागील वर्षीचा पिक विमा तसेच २०१८ मधील काही मंडळातील अतिवृष्टीचे थकीत अनुदान तातडीने मंजूर करून वाटप करावे, मागण्या मंजूर न झाल्यास शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचा इशारा भांबळे यांनी दिला आहे. या वेळी रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, मनोज थिटे, गणेशराव इलग ,विजय खिस्ते, माऊली गायकवाड, रमेश गीते, बर्डे आप्पा, सलीम काझी, राहुल घुले, गजानन कुटे, अंबादास राठोड, पवन जाधव, मांगीलाल राठोड, विश्वंभर पडघन, जलील इनामदार, सरपंच चव्हाण यांच्यासह वझर वाघी, चारठाणा मंडळातील कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
NASA : सेलूच्या ‘तेजश्री’ची उत्तुंग झेप; अंतराळ संशोधन प्रशिक्षणासाठी जाणार अमेरिकेला