शिक्षक दिनानिमित्त नूतन कन्या प्रशालेत विविध कार्यक्रम

शिक्षक दिनानिमित्त नूतन कन्या प्रशालेत विविध कार्यक्रम

नूतन कन्या प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. या वेळी बोलतांना मुख्याध्यापिका संगीता खराबे म्हणाल्या, “विद्यार्थिनींनी जिद्द, चिकाटी, मेहनत याद्वारे आपले ध्येय साध्य करीत यशाची उत्तुंग झेप घ्यावी हीच शिक्षक दिनी आम्हास भेट होईल.” 

सेलू : शिक्षकदिनानिमित्त नूतन कन्या प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  व्यासपीठावर  मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, प्रमुख अतिथी माजी कला शिक्षक श्याम बारस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर, हेमलता देशमुख, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वेशभूषेत असलेल्या पल्लवी सातपुते यांची उपस्थिती होती.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने आणि स्वागत गीताने  कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी साक्षी शेवाळे, जोया शेख, प्राप्ती अवचार, उन्नती भोसीकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. दहावी डच्या विद्यार्थिनींनी  सुरेखा आगळे, कीर्ती राऊत आणि गजानन मजगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कंधारकर समिक्षाने शिक्षकांविषयी आदर व्यक्त करणारे नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. याप्रसंगी शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत यशस्वी विद्यार्थिनींचे  कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन किशोर ढोके, वायाळ सुमेधा, पठाण इसरा यांनी केले, तर माधवी मगर हीने आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.


NASA : सेलूच्या ‘तेजश्री’ची उत्तुंग झेप; अंतराळ संशोधन प्रशिक्षणासाठी जाणार अमेरिकेला

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!