विज्ञान नाट्योत्सव : सेलूतील व्हिजन इंग्लिश स्कूलच्या नाटिकेला प्रथम पारितोषिक
सेलू : येथील व्हिजन इंग्लिश स्कूलच्या Importance of Project विज्ञान नाटिकेने सेलू तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, प्राचार्य हर्षद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ही नाटिका सादर करण्यात आली.अस्मिता परेश संगई यांनी या नाटिकेचे लेखन केले आहे. अमर गोकुळसिंग ठाकूर दिग्दर्शित या नाटिकेला गटशिक्षणाधिकारी कार्यालय सेलूच्या वतीने बुधवारी सहा सप्टेरंबर रोजी प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. नाटिकेमध्ये शिक्षिकेच्या भूमिकेत मिष्टी रोहीत काला, हाय क्लास मॉम महेक निलेश गोरी, मीडल क्लास आई मृणल मुकूंद नेब, वॉचमन मुलगा ओजस संतोष कुलकर्णी, मीडल क्लास मुलगा सर्वेश काशिनाथ पल्लेवाड, मीडल क्लास मुलगी भावना गणेश वाघ, हायक्लास मुलगा अथर्व गोविंद नाईकनवरे, तर वॉचमनची भूमिका शशांक जनार्धन गोळेगांवकर या विद्यार्थ्याने साकारली. नाट्य स्पर्धेचे परीक्षक रवी मुळावेकर, पद्महास पटेल, रेवणअप्पा साळेगावकर, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, सुरेश हिवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. विज्ञान नाट्योत्सव यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेतला.
NASA : सेलूच्या ‘तेजश्री’ची उत्तुंग झेप; अंतराळ संशोधन प्रशिक्षणासाठी जाणार अमेरिकेला