मराठवाडा मुक्तिसंग्राम : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेलूतील सायकल रॅलीला प्रतिसाद
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. मुक्ती संग्रामाचा इतिहास हा रोमांचकारी असून विद्यार्थ्यांनी हा इतिहास सविस्तरपणे अभ्यासायला हवा.कारण या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.स्वातंत्र्यसैनिकांनी केलेले कार्य आणि दिलेल्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हा इतिहास आपल्याला प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन तहसीलदार दिनेश झांपले यांनी केले.येथील हुतात्मा स्मारकात आयोजित सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
सेलू : येथील लोकमान्य टिळक पुतळा ते हुतात्मा स्मारक या दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार झांपले यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.यावेळी सर्व अधिकारी स्वतः सायकलवर या रॅली मध्ये सहभागी झाले होते. क्रांती चौक, जवाहर रोड, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक मार्गे ही रॅलीहुतात्मा स्मारक येथे आल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, मुख्याधिकारी देविदास जाधव,नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव,विजय चिकटे, रमेश मरेवार, मुख्याध्यापक पी.एस. कौसडीकर,प्रा.डॉ के.के.कदम, धनंजय भागवत,एस.व्ही.पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनीही विद्यार्थ्यांना मुक्ती संग्रामाबद्दल माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ काशिनाथ पल्लेवाड यांनी केले.
हिंदी दिन : सांस्कृतिक कार्यक्रमांनी नूतन कन्या शाळेत हिंदी दिन साजरा