हिंदी दिन : सांस्कृतिक कार्यक्रमांनी  नूतन कन्या शाळेत हिंदी दिन साजरा

हिंदी दिन : सांस्कृतिक कार्यक्रमांनी  नूतन कन्या शाळेत हिंदी दिन साजरा

सेलू : सर्व देशवासियांना वंश, धर्म,पंथ, भाषा आधी वरून भेदभाव न मानता सर्वांना एक धाग्यात गुंफणारी भाषा म्हणजे हिंदी होय” असे प्रतिपादन डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले . नूतन कन्या प्रशाला येथे हिंदी दिनानिमित्त शुक्रवारी,१५ सप्टेंबररोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ.यशवंत कुलकर्णी बोलत होते.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी  मुख्याध्यापिका संगीता खराबे, रोहिदास मोगल , भालचंद्र गांजापूरकर  तथा हिंदी विभाग प्रमुख नागेश देशमुख  यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश देशमुख  यांनी केले. याप्रसंगी प्रशालेच्या विद्यार्थिनींनी ‘हिंदी भाषा गौरव गीत ‘ यावर आधारित स्वागत नृत्य सादर केले. भालचंद्र गांजापुरकर , किशोर ढोके  रोहिदास मोगल यांनी हिंदी कविता सादर केल्या. विद्यार्थिनी सई कुलकर्णी, संस्कृती सावजी व समीक्षा कुलकर्णी यांनी गझल प्रस्तुत केली. राष्ट्रभाषा पुणे आयोजित हिंदी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून सत्कार करण्यात आला. हिंदी दिनाचे औचित्य साधून “अंधेरी नगरी ” हे नाटक विद्यार्थिनींनी सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. नाटिकेत प्रशालेच्या २५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापिका संगीता खराबे यांनी, तर सूत्रसंचालन सुषमा दामा, सुजाता रासवे, आणि सुरेखा भांबळे यांनी केले. तर आभार रूपाली पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक यांनी सहकार्य केले.


मराठवाडा मुक्तिसंग्राम : प्रेरणादायी व भविष्याचा वेध घेणारा लढा : प्रा.आबासाहेब देशपांडे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!