Pharmacists Day : सेलूतील आदित्य फार्मसी कॉलेजमध्ये ५५ जणांचे रक्तदान

Pharmacists Day : सेलूतील आदित्य फार्मसी कॉलेजमध्ये ५५ जणांचे रक्तदान

विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त सोमवारी, २५ सप्टेंबररोजी आयोजित रक्तदान शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. उद्घाटनप्रसंगी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ.रामराव रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, सेलू तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव केदार गजमल, माणिकराव डख, प्रेमकुमार चव्हाण, शौकत बागवान, अझहर पठाण, अपूर्वा पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य प्रा.गजानन जाधव व प्रा.अक्षय बन आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना डॉ.रामराव रोडगे म्हणाले की, फक्त देशच नव्हे, तर जागतिक पातळीवर औषधनिर्मात्यांचे काम व त्यांचे योगदान बहुमूल्य आहे. औषधनिर्माता क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नेहमी स्वतःला अद्यावत ठेवणे गरजेचे आहे. जे ज्ञान तुम्ही घेत आहात त्या ज्ञानामध्ये तुम्हाला सतत भर घालावी लागेल. तरच तुम्ही बाहेर स्पर्धेच्या युगात टिकू शकताल. श्रीराम प्रतिष्ठान जागतिक पातळीचे कुशल औषधनिर्माते आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या माध्यमातून तयार करण्यासाठी कटिबद्ध आहे. याप्रसंगी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. संदीप टाक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा.अक्षय बन यांनी केले. सूत्रसंचालन कोमल या विद्यार्थिनीने केले, तर आभार प्रदर्शन प्रा.महेश कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!