सेलूतील नूतन विद्यालयाच्या गुणवंतांचा बुधवारी सत्कार; यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अपूर्व देशपांडे यांची उपस्थिती

सेलूतील नूतन विद्यालयाच्या गुणवंतांचा बुधवारी सत्कार; यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अपूर्व देशपांडे यांची उपस्थिती

विविध पारितोषिकांचे होणार वितरण 

सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील प्रावीण्य प्राप्त, विविध स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा बुधवारी, २७ सप्टेंबररोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 

शाळेच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता हा कार्यक्रम आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अपूर्व देशपांडे (सह्याद्री हॉस्पिटल, पुणे) उपस्थित राहात आहेत. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया असतील. याप्रसंगी उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आरती पांडव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्था गुणवत्ता सन्मान पारितोषिके, पालक शिक्षक संघ व परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या पारितोषिकांनी गुणवंतांना गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक नारायण सोळंके यांनी केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनाने होईल. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे व विद्यार्थी स्वागत गीत सादर करतील. मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक किरण देशपांडे, डी.डी.सोन्नेकर मान्यवरांचे स्वागत करतील. मुख्याध्यापक सोळंके यांच्या प्रास्ताविकानंतर बाबासाहेब हेलसकर प्रमुख पाहुणे डॉ.अपूर्व देशपांडे यांचा परिचय देतील. गुणवंतांच्या सत्कारानंतर प्रमुख पाहुणे डॉ.देशपांडे मार्गदर्शन करतील. संस्था अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया समारोपीय मनोगत व्यक्त होईल. जेष्ठ शिक्षक पी.टी.कपाटे आभार मानतील. पारितोषिक वितरणाचे संचालन विजेंद्र धापसे, आर.डी.कटारे, पाटील, देशपांडे, सोन्नेकर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे करतील. समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


आदर्शवत : सिमेंट रस्त्यासह शाळेला विविध सुविधा; सेलूतील मुकुंद आष्टीकरांचा मुलाच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!