आदर्शवत : सिमेंट रस्त्यासह शाळेला विविध सुविधा

आदर्शवत : सिमेंट रस्त्यासह शाळेला विविध सुविधा

सेलूतील मुकुंद आष्टीकरांचा मुलाच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 

मुलगा श्रीनिवासच्या वाढदिवसानिमित्त प्रयोगशाळा साहित्य, विविध प्रकारच्या खेळणी, ग्रंथालयाला पुस्तके, शुद्ध पाण्याचा आरओ फिल्टर, सर्व वर्गामध्ये सिलिंग फॅन आदींसह दरवर्षी शाळापयोगी साहित्य मुकुंदराव आष्टीकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वर्षी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत जवळपास दीडशे फूट लांबीचा सिमेंट क्रॉंकिटचा रस्ताही त्यांनी करून दिला आहे. 

सेलू जि.परभणी : वाढदिवसानिमित्त होणार्‍या अनावश्यक खर्चाला फाटा देत, गेल्या सहा वर्षांपासून शाळेसाठी दीडशे फुट सिमेंट रस्त्यासह विविध भौतिक सोयीसुविधा, शाळापयोगी साहित्य उपलब्ध करून देत, सेलू (जि.परभणी) येथील मुकुंदराव आष्टीकर कुटुंबिय मुलाचा वाढदिवस साजरा करतात. आष्टीकर यांचा मुलगा श्रीनिवास इयत्ता पहिलीपासून सेलूच्या बाहेती-बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. यंदा तो दहावीला आहे. शाळेसाठी शंभर फायबर खुर्च्या भेट देऊन आष्टीकर कुटुंबियांनी सोमवारी, २५ सप्टेंबररोजी श्रीनिवासच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायण लोया यांच्या हस्ते श्रीनिवासची आई जया आणि वडील मुकुंदराव आष्टीकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्राचार्य नरेंद्र पाटील, भूषण देऊळगावकर यांची उपस्थिती होती. मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रयोगशाळा साहित्य, विविध प्रकारच्या खेळणी, ग्रंथालयाला पुस्तके, शुद्ध पाण्याचा आरओ फिल्टर, सर्व वर्गामध्ये सिलिंग फॅन आदींसह दरवर्षी शाळापयोगी साहित्य आष्टीकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. गेल्या वर्षी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत जवळपास दीडशे फूट लांबीचा सिमेंट क्रॉंकिटचा रस्ताही त्यांनी करून दिला आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून शाळेसाठी विविध माध्यमांतून आष्टीकर यांचे सहकार्य लाभत आहे, असे देऊळगावकर यांनी सांगितले. आष्टीकर कुटुंबियांच्या या आदर्शवत उपक्रमाचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मुलगा श्रीनिवास पहिलीपासून बाहेती – बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्याचा वाढदिवस संस्मरणीय व्हावा आणि शाळेला थोडेफार साहाय्य व्हावे, याच उद्देशाने हा अल्पसा प्रयत्नवादी उपक्रम आहे. शाळेने यासाठी संधी दिली. या बद्दल कृतज्ञ आहे. यापुढेही विविध शैक्षणिक उपक्रमासाठी निश्चितच सहकार्य करणार आहे. – मुकुंदराव आष्टीकर, पालक


सेलूतील नूतन विद्यालयाच्या गुणवंतांचा बुधवारी सत्कार; यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अपूर्व देशपांडे यांची उपस्थिती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!