सेलू, पाथरीमध्ये जोरदार पाऊस; ओढे तुडुंब 

सेलू, पाथरीमध्ये जोरदार पाऊस; ओढे तुडुंब 

परभणी जिल्ह्यातील हट्टा (ता.सेलू) शिवारात मंगळवारी झालेल्या पावसामुळे ओढे तुडुंब भरून वाहू लागले.

परभणी : जिल्ह्यात मागील २४ तासात मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत सरासरी १३.५ मिलीमीटर पाऊस पडला असून, सेलू तालुक्यात सर्वाधिक ३०.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी दुपारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळी साडे अकरापर्यंत पाथरी (२६.४), सोनपेठ (२२.७) मानवत (१५.५), जिंतूर (१४.३), पालम (१०.८), गंगाखेड (६.५), पुर्णा (३.८) आणि परभणी (१.९ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!