मराठा आरक्षण : आहेर बोरगावमध्ये लाक्षणिक उपोषण
सेलू : अंतरवाली सराटे येथील आंदोलनकर्त्यावर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा म्हणून सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे मंगळवारी, २६ सप्टेंबररोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आहेरनाथ मंदिर परिसरात सकाळी दहाच्या सुमारास लक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. उपोषणामध्ये मराठा समाज बांधवांनी मोठा सहभाग घेतला.