नूतन शाळेने अनेक व्यक्तिमत्त्वे घडविली : डॉ.अपूर्व देशपांडे

नूतन शाळेने अनेक व्यक्तिमत्त्वे घडविली : डॉ.अपूर्व देशपांडे

सेलूच्या नूतन विद्यालयातील दीडशेवर गुणवंतांचा गौरव 

भारतामध्ये विविध वैद्यकीय संस्था आणि तज्ज्ञ अवयव प्रत्यारोपणासाठी परिश्रमपूर्वक पुढाकार घेत आहेत. परंतु सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परवडावा. गरजू रुग्णांना जीवदान मिळावे यासाठीच्या अवयव दान जनजागृती चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे भावपूर्ण आवाहन पुणे येथील यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अपूर्व देशपांडे यांनी यावेळी केले.

सेलू जि.परभणी : गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेमध्ये राबविण्यात येत असलेल्या कला, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध सहशालेय उपक्रमांद्वारे कळत- नकळत संस्कारांचे सिंचन होत राहाते. याद्वारे खर्‍या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडत असते. अशी अनेक व्यक्तिमत्त्वे नूतन शाळेने घडविली. घडत आहेत, असे मत माजी विद्यार्थी तथा यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.अपूर्व देशपांडे (पुणे) यांनी येथे केले.

शाळेतील १६७ गुणवंतांचा गौरव डॉ.देशपांडे यांच्या हस्ते बुधवारी, २७ सप्टेंबररोजी झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.देशपांडे बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. याप्रसंगी चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, दत्तराव पावडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आरती पांडव, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.देशपांडे म्हणाले की, “जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे.‌ परिश्रमात सातत्य आणि प्रामाणिकपणे ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सोबतच निरामय जीवनाच्या आनंदासाठी व्यायामद्वारे शारीरिक, मानसिक आरोग्य जपण्याची गरज आहे.” याप्रसंगी इयत्ता दहावीतील प्रावीण्य प्राप्त, विविध स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या १६७ गुणवंतांचा नूतन विद्यालय शिक्षण संस्था गुणवत्ता सन्मान, पालक शिक्षक संघ, परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाची विविध पारितोषक देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक नारायण सोळंके यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन अशोक लिंबेकर यांनी केले. बाबासाहेब हेलसकर यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. सच्चिदानंद डाखोरे आणि विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे, संतोष पाटील, देविदास सोन्नेकर, किशोर कटारे, विजेंद्र धापसे यांनी केले. परसराम कपाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.


मोबाईलमुळे भाषा कौशल्य विकासाला अडथळा; सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानामाला परिसंवादातून उमटला सूर

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!