मराठा आरक्षण : …हा लढा आता थांबणार नाही : मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षण : …हा लढा आता थांबणार नाही : मनोज जरांगे पाटील

परभणीतील सभेला मोठा प्रतिसाद, १४ ऑक्टोबरच्या आरक्षण मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन 

परभणी : आपण मराठा समाजाशी प्रामाणिक आहोत. यामुळेच परभणीतही ही लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवास सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. त्यामुळे अशीच एकजूट कायम ठेवा, १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे आयोजित मराठा आरक्षण मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी परभणी येथील जाहीर सभेत केले.
शहरातील संत तुकाराम महाविद्यालयासमोरील मैदानावर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, पूर्वीपासून मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे हा लढा आता थांबणार नाही. आपण समाजाशी प्रमाणिक असून हा प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. सरकारने आत्तापर्यंत अनेक आश्वासने देऊन नवनवीन आदेश काढून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम केले. अंतरवाली सराटी येथील उपोषणाला अनेक नेत्यांनी भेटी दिल्या. मात्र, मागणीपासून आपण बाजूला गेलो नाही. आंदोलन मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला गेला होता. एवढे करूनही महिला व पुरुषांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. एवढे होऊनही मागे हटलो नाहीत म्हणून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. येत्या १४ ऑक्टोबरला सरकारने आश्वासन देऊन एक महिना पूर्ण होत असल्याने या दिवशी एक इशारा म्हणून अंतरवाली सराटी येथे आयोजित मराठा आरक्षण मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले. सभेला मराठा समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


परभणी : शिक्षकांच्या महाआक्रोश मोर्चाला मोठा प्रतिसाद

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!