स्वच्छता जनजागरण फेरीला प्रतिसाद

स्वच्छता जनजागरण फेरीला प्रतिसाद

सेलूतील नूतन कन्या शाळेचा उपक्रम

सेलू : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्वच्छता संकल्प अभियानाचे औचित्य साधून सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या वतीने स्वच्छता जनजागरण फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

‘एक तारीख एक तास स्वच्छता हाच ध्यास’ स्वच्छता जनजागरण फेरीच्या उदघाटनप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया, संस्था सचिव प्राचार्य डॉ.विनायक कोठेकर,  मुख्याधिकारी देविदास जाधव, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, शिवनारायण मालाणी, महिला मंडळ अध्यक्षा विजया कोठेकर, सचिव ललिता गिल्डा, सुयश पटवारी, रामवल्लभ राठी, शेख मुनीर, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, श्याम पटवारी, दिलीप भंडारी, शिकारे, अशोक कासार, सूर्यवंशी, मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, भालचंद्र गांजापूरकर यांची उपस्थिती होती.
स्वच्छता जनजागरण फेरीची सुरवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. नूतन कन्या प्रशाला, नूतन  रोड, क्रांती चौक, जवाहर रोड, मोंढा या मार्गाने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ समारोप झाला. स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ सेलू सुंदर सेलू,  स्वच्छतेचे महत्व झाडे लावा झाडे जगवा, नका करू तुझं माझं, पर्यावरण आहे सर्वांच, या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून गेला. प्रास्ताविक संगीता खराबे यांनी केले. या प्रसंगी शिवनारायण मालाणी, देविदास जाधव, डॉ.व्ही.के.कोठेकर यांनी स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शन केले. सुषमा दामा, सीमा सुक्ते व किशोर ढोके यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सादर केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी, तर आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले.


नूतन विद्यालयातील नवीन जलकुंभाचे उद्घाटन; चिमुकल्या सोमनाथला मिळाला मान

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!