DAY-NULM : सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल : सीओ देविदास जाधव; सेलू शहर उपजिवीका केंद्राचे उद्घाटन

DAY-NULM : सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल : सीओ देविदास जाधव; सेलू शहर उपजिवीका केंद्राचे उद्घाटन

मान्यवरांसह बचतगट पदाधिकारी, महिलांची मोठी उपस्थिती 

सेलू जि.परभणी : दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सेलू नगरपालिकेच्या वतीने सेल शहर उपजिवीका केंद्राचे उद्घाटन मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधीकारी देविदास जाधव यांच्या हस्ते बुधवारी, चार ऑक्टोबररोजी झाले. शहर उपजिवीका केंद्राद्वारे बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील तसेच सामान्यांचे जीवनमान उंचावेल, असे मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.

नगरपालिका सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी सहायक अधीक्षक अविनाश भिसे, पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसीन अहमद, डाॅ.शिवाजी शिंदे, पाणी पुरवठा विभागाचे तथा महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी शहर उपजीविका अभियान अंतर्गत माहिती दिली. शहरी गरीब जीवनमान व त्यांना उपजीविकेची शाश्वत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अंमलबजावणी सन २०१६ पासून राज्यात सुरू झालेली आहे. या अभियान अंतर्गत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध सेवा व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करण्यास शहर उपजिविका केंद्र संकल्पना आकारास आली आहे. छोट्या उद्योगांना साहाय्य करणे, स्वयंसहाय्यता बचत गटाव्यतिरिक्त छोट्या उद्योगांना नोंदणी करण्यात सहाय्यता, नवीन उद्योग उभारणीस मदत करणे, शासकीय योजनांचे आर्थिक व भौतिकलाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करून सीएलसीद्वारे मदत करणे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहर उपजिविका केंद्र राबवू शकतात. ही योजना महीला व पुरुष लाभार्थींना मिळू शकते. अभियानातंर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना सेवा व वस्तु यांची पुरवठादार म्हणून नोंदणी करण्यात येत आहे. लाभार्थीना खाजगी कंपन्यांत रोजगार उपलब्ध करुन बचत गटाचे उत्पादन शहर व उपजिविका केंद्रामार्फत विक्री करण्यासाठी उपयुक्त ठरते. शहर उपजीविका केंद्राचे प्राप्त झालेले निधी, खर्च, वस्तू व सेवाद्वारे उत्पन्न याचा ताळमेळ घेणे आवश्यक आहे. हा उपक्रम अभियानातील घटकाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहाय्याभूत ठरतो. हा उपक्रम राबवून शहरात अभियानाची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असा संकल्प यावेळी करण्यात आला. नगरपालिका कर्मचारी, बचत गटाचे पदाधिकारी सदस्य व महिलांची मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!