गोळीबाराच्या प्रयत्नातील एका आरोपीला अटक, सहा जणांविरोधात गुन्हा

गोळीबाराच्या प्रयत्नातील एका आरोपीला अटक, सहा जणांविरोधात गुन्हा

परभणीतील पाथरी रोडवरील हॉटेलजवळील घटना

परभणी : परभणी शहरातील पाथरी रोडवरील हॉटेल सिंडीकेटमध्ये मंगळवारी, तीन ऑक्टोबररोजी रात्री साडे अकराच्या सुमारास दोन गटात झालेले भांडण सोडविण्यासाठी युवा सेनेचे पदाधिकारी तथा हॉटेल व्यावसायिक अर्जुन सामाले हे गेले असता, त्यांच्यासमोर गोळाबाराचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पिस्टल व जिवंत राऊंडसह एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले असून नानलपेठ पोलीस ठाण्यात एकूण सहा आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मंगळवारी पाथरी रोडवरील हॉटेल सिंडीकेट येथे भांडण झाले असून त्यात आरोपीने पिस्टल काढून फायर करण्याचा प्रयत्न केला परंतू फायर झाला नाही. या गुन्ह्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांंच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पथक नेमून माहिती काढण्यात आली. त्यानुसार शेर खान समंदर खान पठाण (रा. खंडोबा बाजार, परभणी) याने व त्याच्या मित्रानी पाथरी रोडवरील हॉटेल सिंडीकेट येथे त्याच्या मित्रासोबत जाऊन भांडण केल्याची माहिती मिळाली. ल्यावरून तांत्रिक माहितीआधारे सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेण्यात आले. आरोपी शेर खान समंदर खान पठाण (वय २१ वर्षे, रा. खंडोबा बाजार, परभणी) हा मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी अर्जुन सामाले व शेर खान याचा मित्र यांच्यात वाद झाला. त्यामध्ये आरोपी शेर खान याने त्याच्याकडील गावठी कट्टा काढून जमिनीत फायर करण्याचा प्रयत्न केला. परंतू फायर झाला नसल्याचे सांगत असल्याने त्याला पुढील तपासासाठी नानलपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या घटनेवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Pradhan Mantri Awas Yojana : मानवत पंचायत समितीला प्रथम पुरस्कार

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!