पंजाबच्या शाही इमामांचे रविवारी सेलूत व्याख्यान
सेलू : पंजाब राज्याचे शाही इमाम मौलाना मोहम्मद उस्मान साहाब लूधयानवी यांचा धार्मिक व्याख्यांनाचा कार्यक्रम अयोजिण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनजवळील मदिना मस्जीद येथे आठ ऑक्टोबर, रविवाररोजी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आहे.अध्यस्थांनी आमदार बाबाजानी दूर्राणी असतील. मौलाना उस्मान साहाब यांच्या कुटुंबियांचे भारतातीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असून, त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे. त्यांच्या कुटुंबियांचे कार्य पाहून सरकारतर्फे त्यांना शेरे पंजाब पदवी बाहाल करण्यात आली आहे. व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन अयोजक मोहम्मद याहिया खाॅन, सय्यद इम्रान यांनी केले आहे
उर्ध्व धरणातून जायकवाडी, माजलगावमध्ये हक्काचे पाणी सोडा; राज्य किसान सभेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी