निर्भय बनो : डॉ.विश्वंभर चौधरी यांचे बुधवारी सेलूत व्याख्यान

निर्भय बनो : डॉ.विश्वंभर चौधरी यांचे बुधवारी सेलूत व्याख्यान

संविधान बचाव समिती सेलूच्या वतीने आयोजन, उपस्थित राहाण्याचे आवाहन

सेलू जि.परभणी : देशातील वर्तमान ज्वलंत राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने परखड आणि जळजळीत वास्तव मांडणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय विश्लेषक डॉ.विश्वंभर चौधरी (पुणे) यांचे बुधवारी, ११ ऑक्टोबररोजी ‘निर्भय बनो’ चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने व्याख्यान आयोजिण्यात आले आहे.
संविधान बचाव समिती सेलूच्या वतीने साई नाट्य मंदिरात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होत आहे. अध्यक्षस्थानी रामकृष्ण शेरे पाटील असतील. स्वागताध्यक्ष शेख महेमुदसर यांची उपस्थिती राहणार आहे. सेलू शहर व तालुक्यातील संवेदनशील जागरूक नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दत्तूसिंग ठाकूर, ॲड.विष्णू ढोले, जाहेद घौरी, श्रीनिवास उघडे के.डी.वाघमारे, रामेश्वर पौळ, सुनील गायकवाड, शेख साजीद, जकी सर, अमजद बागवान, शेख नफीस, दत्ता श्रावणे, बापू खनपटे, विश्वास शेरे, शिवाजी रणखांबे, राजीक कुरेशी, बापू धापसे, सोहेब जमीनदार, शेख सिराज व संयोजन समितीने केले आहे.

निर्भय बनो : डॉ.विश्वंभर चौधरी यांचे बुधवारी सेलूत व्याख्यान


Maratha Reservation : कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासाठी कार्यपध्दती समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्यात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!