सेलूच्या श्री केशवराज महिला भजनी मंडळाची राज्यस्तरासाठी निवड

सेलूच्या श्री केशवराज महिला भजनी मंडळाची राज्यस्तरासाठी निवड

भजन स्पर्धा : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयोजन

सेलू जि.परभणी :  कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नांदेड येथे सहा ऑक्टोबररोजी आयोजित गटस्तरीय खुल्या महिला भजन स्पर्धेत सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज भजनी मंडळाने प्रथम क्रमाकांचे पारितोषिक पटकाविले असून, येत्या जानेवारीमध्ये आयोजित खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
स्पर्धेत एकूण बारा संघ सहभागी झाले होते. याच स्पर्धेत उत्कृष्ट गायिकेचा व उत्कृष्ट हार्मोनियम वादकाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सेलूच्या पूजा तोडकर यांना मिळाला. संघामध्ये जयश्री सोन्नेकर, पूजा तोडकर, रश्मी बाहेती, अनघा पांडे, पद्मजा खारकर, मनिषा पांडे , प्रिती राठी, शिला दिक्षित, साक्षी गोसावी, अलका पांडे, इंदुमती ढोके, कामेश हिंगणे यांचा सहभाग होता.
कामगार कल्याण मंडळाचे सुरेश अंभोरे यांचे संघास सहकार्य लाभले. या यशाबद्दल भजनी मंडळाचे अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!