Selu Doctors Association : अध्यक्षपदी डॉ.ऋतुराज साडेगावकर; डॉ.आशिष मेहता सचिव

Selu Doctors Association : अध्यक्षपदी डॉ.ऋतुराज साडेगावकर; डॉ.आशिष मेहता सचिव

सेलू जि.परभणी : सेलू तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.ऋतूराज साडेगावकर यांची, तर सचिवपदी डॉ.आशिष मेहता यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. असोसिएशनची बैठक गुरूवारी,पाच ऑक्टोबररोजी प्रॉस्पेरस इंग्लिश स्कूलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी डॉ.सुनील कुलकर्णी होते. यावेळी तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब जाधव, सहसचिव डॉ.सुवर्णा नाईकनवरे, कोषाध्यक्ष डॉ.परेश बिनायके, डॉ.अनुपमा जवळेकर, डॉ.अश्विनी गायकवाड, डॉ.अनुराग जोगदंड आदी पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचा समावेश आहे. मार्गदर्शक समितीमध्ये डॉ.संजय रोडगे, डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.अरविंद बोराडे, डॉ.विजेंद्र नागोरी, डॉ.राजेंद्र गात आहेत. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!