जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : आमदार डॉ.राहुल पाटील

जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : आमदार डॉ.राहुल पाटील

जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य सुविधांचा आढावा

परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणेच्या अधिकार्‍यांसोबत आढावा बैठकपार पडली. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बन, अपर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बालाजी शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, डॉ.अमोल भालेराव यावेळी उपस्थित होते. 

आमदार डॉ.पाटील यांनी यावेळी रुग्णालयातील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे सांगून, रिक्त पदे कंत्राटी स्वरुपात का होईना लवकर भरण्याबाबत सांगितले. तसेच रुग्णालयातील विद्युत उपकरणांची दुरुस्ती, इमारतीतील किरकोळ दुरुस्ती, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, आगप्रतिबंधक उपकरणे तपासणे, येथील भूमिगत गटारींचे काम करणे, सौरपँनेलच्या माध्यमातून विजेवरील भार कमी करणे यासह स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या इमारती तात्काळ पाडण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला दिल्या. तसेच रुग्णालयातील अंतर्गत रस्त्यांची विनाविलंब दुरुस्ती करावी, असे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. रामटेके यांच्याशी संपर्क साधून, जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी आवश्यक सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना केल्या. तसेच यासंदर्भात लवकरच वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यासाठी सूचना दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!