मंठ्याच्या श्री रेणुका माता दर्शनासाठी मोफत वाहन सुविधा

मंठ्याच्या श्री रेणुका माता दर्शनासाठी मोफत वाहन सुविधा

सेलूतील डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळाचा उपक्रम, 

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान व डॉ.संजयदादा रोडगे मित्रमंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त मंठा येथील सिद्धपीठ श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी सोमवारपासून (१६ ऑक्टोबर) मोफत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

सोमवारी जिल्हा परिषद रवळगाव सर्कल मधील विविध गावातील महिलांनी श्री रेणुका माता देवी दर्शनाचा लाभ घेतला. सेलू येथे संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे यांनी महिलांशी संवाद साधला. याप्रसंगी श्री रेणुका मातेचा फोटो व फराळाचे वाटप करण्यात आले. शिंदे टाकळीच्या सरपंच आश्विनी कैलास पवार तसेच उपसरपंच नंदा रामेश्वर पवार, कैलास पवार, रामेश्वर पवार, मित्रमंडळाचे प्रकाश गजमल, गणेश रोडगे, दत्तराव लाटे, संजय गटकळ तसेच शिंदे टाकळी येथील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!