APJ Abdul Kalam : नूतन कन्या प्रशालेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात
सेलू : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतीक्षा मोगल या विद्यार्थिनींने ‘अग्निपंख’ पुस्तकाचा परिचय देत विवेचन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, वैशाली टकले, अनिल टकले, रेणुका अंबेकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर, तर सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले.