वाचन प्रेरणा दिन : पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाचन प्रेरणा दिन : पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम 

सेलू : येथील नूतन विद्यालयातील माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त सोमवारी, १६ ऑक्टोबररोजी रा.ब.गिल्डा सभागृहात पुस्तक प्रदर्शन आयोजिण्यात आले होते. ज्येष्ठ शिक्षक अशोक लिंबेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक संतोष पाटील होते. मुख्याध्यापक नारायण सोळंके, पर्यवेक्षक किरण देशपांडे, सुरेश हिवाळे यांची उपस्थिती होती.

वाङमयाच्या विविध प्रकारांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यादृष्टीने कथा, कविता संग्रह, कादंबरी, बाल साहित्य, समिक्षा ग्रंथ, विश्वकोश, कुमारकोश, संदर्भ ग्रंथ पुस्तक प्रदर्शनात ठेवण्यात आले होती. सुरेश हिवाळे मनोगतातून सांगितले की, ‘ पुस्तके माणसांना अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातात. जग, जीवन, माणसांकडे व्यापक दृष्टीने बघायला शिकवतात. ग्रंथांच्या वाचनातून सुसंस्कृत समाज निर्माण होतो. या प्रसंगी नियमित वाचक मनिष गिराम, वरद सावळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. साक्षी लोखंडे, शंतनू पवार, विठ्ठल येवले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे व गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक ग्रंथपाल अंजली देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन आदिती अंबेकर यांनी तर आभार संध्या फुलपगार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. काशिनाथ पल्लेवाड, शिल्पा बरडे, अश्विनी पटाईत, मीरा शेटे, बाळू बुधवंत, फुलसिंग गावित, रामेश्वर पवार, गोविंद रामपुरकर, यांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!