OBC Reservation : सरकाराने ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, सेलूमध्ये जोरदार धरणे आंदोलन

OBC Reservation : सरकाराने ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, सेलूमध्ये जोरदार धरणे आंदोलन

उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले निवेदन

सेलू जि.परभणी : ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू करून ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये. आरक्षण अबाधित ठेवावे आदींसह विविध मागण्या ओबीसी बांधवांनी सोमवारी, १६ ऑक्टोबररोजी केलेल्या धरणे आंदोलनाद्वारे केल्या आहेत.
भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागासवर्ग आणि ओबीसी बांधवांच्या वतीने सोमवारी, १६ ऑक्टोबररोजी सकाळी साडे दहा पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन पाठविण्यात आले.
ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणना करणे, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवणे, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू करणे. भारतीय संसदेमध्ये महिलांच्या ३३ आरक्षणात ओबीसी महिलांना २७ टक्के आरक्षण राखीव ठेवणे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह व अभ्यासिका उपलब्ध करणे, महाराष्ट्र शासनाने लागू केलेला कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करणे, शाळांच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करणे. सहकारी संस्थाच्या कायद्यात दुरुस्ती करून ओबीसींना अध्यक्ष व उपाध्यक्ष, सभापती व उपसभापती, चेअरमन व उप चेअरमन यामध्ये आरक्षण देणे, ओबीसीच्या नेत्यांना, प्रतिनिधीना धमक्या देणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.‌ मागण्यांची सरकारने गांभीर्याने दाखल घेऊन तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा; तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी  ओबीसी नेते नानासाहेब राऊत, गणेश नाईकवाडे, प्रकाश मुळे, संजय साडेगावकर, आनंद डोईफोडे, भागवत दळवे, पवन कटारे, किशोर कारके, प्रभाकर गिराम, महादेव गायके, प्रभाकर इंगळे, बाळासाहेब काजळे, विकास आढे, भारत इंद्रोके, विनोद तरटे, माऊली राऊत, एकनाथ टाकरस, गोपाळ बोकन, शिवाजी चौरे, रमेश गोरे, बाळू प्रधान, शाम कटारे, गजानन घुगे, सचिन कोरडे, योगेश कथले, पंकज चव्हाण, अरुण हारकळ, गणेश गोरे, माऊली राठोड, कृष्णा गोरे, बाळू गिराम यांच्यासह सेलू तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!