नामदेव माळी यांचे सोमवारी सेलूमध्ये व्याख्यान
शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू जि.परभणी : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती, वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने सेलूकर शिक्षकांनी मांडलेला प्रबोधन जागर अक्षर व्याख्यानमाले अंतर्गत सोमवारी, १६ ऑक्टोबररोजी प्रयोगशील सेवानिवृत्त अधिकारी नामदेव माळी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे. नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात सायंकाळी ६ वाजता व्याख्यान आहे. याप्रसंगी साहित्यिक तथा शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील सेवानिवृत्त अधिकारी नामदेव माळी यांचे ‘भाषा अभिव्यक्ती व लेखन’ या विषयावर विचार मांडणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. यशस्वीतेसाठी शरद ठाकर, सुरेश हिवाळे, माधव गव्हाणे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, रमेश नखाते, डाॅ.सतिश मगर,सुभाष मोहकरे, रामराव गायकवाड,रामराव बोबडे, विजय ढाकणे पुढाकार घेत आहेत.