नवरात्र महोत्सव : सेलूतील श्री जगदंबा देवी मंदिरात विविध कार्यक्रम

नवरात्र महोत्सव : सेलूतील श्री जगदंबा देवी मंदिरात विविध कार्यक्रम

साडेतीनशे वर्षांची परंपरा कायम, भाविकांची गर्दी

सेलू जि.परभणी : येथील अत्यंत पुरातन व साडे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या शेरे गल्लीतील जगदंबा नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या महोत्सवाअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कचरू शेरे यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधीवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी बालाजी देऊळगावकर यांनी पौरोहित्य केले. येथील शेरे परिवाराचे हे कुलदैवत आहे. या महोत्सवात दररोज दुपारी १२ ते ४ यावेळेत भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीमधून देवी भागवतकथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज देवीचे जागरण गोंधळ, भारूड, भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आठव्या माळीला, २२ ऑक्टोबर रोजी रात्री देवीचा होम होणार आहे. तसेच दररोज रात्री महाआरतीदेखील होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत जयराम तांगडे महाराज यांचे कीर्तन होणार आहे. नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता देवीची (छबिना) मिरवणूक काढण्यात येते. नवरात्रात महिलांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. आराधी व परडीवाल्यांचीदेखील आवर्जून उपस्थिती असते. नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने मंदिरात व परिसरात दिव्यांची रोषणाई केली जाते. नवरात्र महोत्सव म्हणजे शेरे गल्लीतील पारंपरिक दिवाळीच असते. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!