नवरात्र महोत्सव : श्री जगदंबेच्या दर्शनाला देवी पिंपळगावमध्ये गर्दी
महाशिवपुराण कथा, कीर्तन आदी विविध कार्यक्रम
सेलू् जि.परभणी : तालुक्यातील तिडी पिंपळगाव (देवीचे) येथील प्राचीन श्री जगदंबा देवीच्या नवरात्र महोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. या वर्षी रविवारपासून (१५ ऑक्टोबर) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.तिडी पिंपळगाव येथे काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, महाआरती, हरिपाठ, दररोज रात्री आठ वाजता कीर्तन, जागर आदी दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भागीरथजी सारस्वत महाराज महाशिवपुराण कथा निरुपण करीत आहेत. भागवत महाराज शिंदे, भानुदास महाराज सेलूदकर, बाळु महाराज घुमरे पिंपळगावकर, बजरंग महाराज टाकरवणकर यांची कीर्तन सेवा झाली. गुरुवारी महादेव महाराज इरळदकर, शुक्रवारी श्रीरंग महारज वाहेगावकर, शनिवारी आचार्य १००८ स्वामी शिवेंद्र चैतन्य . रविवारी शिवा महाराज सुकळीकर यांचे कीर्तन आहे. गायनाचार्य गणेश महाराज वाघमारे, मृदंगाचार्य राम महाराज गायकवाड व विविध गावचे भजनी मंडळ साथसंगत करीत आहेत. दररोज सकाळी व सायंकाळी गावकऱ्यांतर्फे अन्नदान सेवा केली जात आहे, अशी माहिती सहसचिव विठ्ठलराव जाधव यांनी दिली. लक्ष्मीकांत गुरुजी वझरकर यांच्या पौराहित्याखाली होमहवन आहे. रविवारी कुकुम अर्चन कार्यक्रम होईल. तर सोमवारी हरिभाऊ महाराज वायाळ पांगरीकर यांचे काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
काकाडा भजन नेतृत्व महिला भजनी मंडळ तिडी पिंपळगाव, तर ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व किसनराव जोगदंड, खंडराव घुमरे, हरीपाठ नेतृत्व भजनी मंडळ तिडी पिंपळगाव करीत आहेत. गायनाचार्य गणेश महाराज वाघमारे व तिडी पिंपळगाव, झोडगाव, गुगळी धामणगाव, हिस्सी, मानोली, डिग्रस, कुंडी, करंजी, ढेंगळी पिंपळगाव, सोमठाणा, बोदरवाडी, कोल्हा, गव्हाण, देवनांद्रा, राधे धामणगाव भजनी मंडळी साथसंगत करीत आहेत.
महोत्सव काळात बाबुराव जोगदंड, बाबासाहेब घुमरे रामभाऊ घुमरे, संतोष कथवे कल्याण जोगदंड, शंकर जोगदंड, भगवान घुमरे, सतिष घुमरे, विश्वनाथ जोगदंड, तुकारामजी जोगदंडस. संदिप घुमरे, प्रणव घुमरे, शामराव घुमरे, सुदाम जोगदंड, योगेश मुंजाभाऊ मगर, रासवे परिवार, बाळासाहेब घुमरे, बाबा घुमरे, बाळु महाराज घुमरे, बाबुराव शेषराव जोगदंड, एकतारी भजनी मंडळ पिंपळगाव, डिगांबर रासवे , ज्ञानेश्वर जोगदंड, पोंढे परिवार, तुकाराम जोगदंड, विपुल जोगदंड, ज्ञानोबा सुदंरराव जोगदंड आदींसह ग्रामस्थ अन्नदान सेवा करीत आहेत. जगदंबा देवी संस्थानचे अध्यक्ष यशवंत जोगदंड, सचिव रवींद्र शर्मा, कैलास घुमरेआदींसह गावकरी मंडळी पुढाकार घेत आहे