नवरात्र महोत्सव : सेलूतील नूतन कन्या शाळेत नवदुर्गांचा सन्मान

नवरात्र महोत्सव : सेलूतील नूतन कन्या शाळेत नवदुर्गांचा सन्मान

व्यवसाय मार्गदर्शन विभागांतर्गत ‘स्त्रीशक्तीचा जागर’

सेलू जि.परभणी : सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन नूतन कन्या प्रशालेतील व्यवसाय मार्गदर्शन विभागाच्या वतीने नवरात्र महोत्सवानिमित्त ‘स्त्रीशक्तीचा जागर’ उपक्रम राबविण्यात आला.‌ या अंतर्गत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान नवदुर्गांचा मुख्याध्यापिका संगीता खराबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.‌ कीर्तनकार शुभांगी देशमुख, उद्योजिका अरुणा जाधव, विधीज्ञ रुपाली आम्ले, कोतवाल शुभांगी मोगल, पोस्टमन रत्ना तुपसमिंद्रे, डिझायनर वैशाली टकले, आरोग्यसेविका‌ सरोज पाजगे, नृत्यांगना पल्लवी मुंडीक आदींचा यथोचित सत्कार करण्यात आला. या नवदुर्गांनी आपला जीवन प्रवास विद्यार्थ्यिनींना उलगडून सांगितला.‌ उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, सुनील मोगल यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुषमा दामा, कीर्ती राऊत यांनी केले. उपक्रमासाठी रेणुका अंबेकर, वैशाली चव्हाण, सुरेखा आगळे, सीमा सुक्ते, विजया खडके, ज्योती कुंभकर्ण, सपना पाटणी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!