Asthma Medicine : सेलूतील गोशाळेकडून दमा रूग्णांना मोफत औषधी
कोजागिरी पोर्णिमेनिमित्त श्रीगोविंदरामजी दादुपंथी मठ गोशाळेचा उपक्रम
सेलू जि.परभणी : येथील श्रीगोविंदरामजी दादुपंथी मठ गोशाळा व बैद्यनाथ कंपनीच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी कोजागिरी पोर्णिमेनिमित्त दमा (अस्थमा) रूग्णांना मोफत औषधीची वाटप शनिवारी, २८ आक्टोबररोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. गोशाळा व बैद्यनाथ कंपनीच्यावतीने ही औषधी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रुग्णांसाठी गायीचे दुध, मुळ्याच्या भाजीपाला, मातीचेपात्र साहित्य गोशाळेकडून दिले जाईल. रुग्णांनी औषधीसाठी सूर्यकांत जाधव 8329933472, गणेश भागडे 8830244005, बबलू दायमा 9422559370, श्रीनिवास काबरा 9028357975, विजय पांडे 9405390271, गोविंद शेलार 9271413199, शिवनारायण मालाणी 9422886889 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सुरेंद्र तोष्णीवाल, जगन्नाथ पवार, राजेंद्र करवा, कृष्णा काटे, राधेश्याम राठी, अशोक शेलार,आनंद सोनी,अनुप गुप्ता, रमेश काला यांनी केले आहे. केले आहे.