Dr.Babasaheb Ambedkar : डॉ.आंबेडकर उद्यानातील अतिक्रमण रोखा; चळवळीतील कार्यकर्त्यांची सेलूत मागणी 

Dr.Babasaheb Ambedkar : डॉ.आंबेडकर उद्यानातील अतिक्रमण रोखा; चळवळीतील कार्यकर्त्यांची सेलूत मागणी 

आंबेडकरी जनतेतून तीव्र संताप

सेलू : येथील न्यायालय परिसराला लागून असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उद्यानासाठी आरक्षीत जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षण भिंतीचे काम सुरू केले. हे काम तात्काळ बंद करावे, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे गुरुवारी, २६ ऑक्टोबररोजी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या परीसरात उद्यानासाठी जागा राखीव आहे. न्यायालयाच्या कामाचे कंपाऊंड वॉलचे बांधकाम सध्या सुरू असून सदर कंपाऊंडवाल हे उद्यानासाठी राखीव जागेवरती घेण्यात येत आहे. सदर जागा ही अतिक्रमण करून न्यायालयाचे आवारात घेण्याचा प्रयत्न होत आहे.

याबाबत यापूर्वीही वेळोवेळी ही बाब लक्षात आणून देण्यात आली होती. या आरक्षीत जागेचे संरक्षण व्हावे. याकरीता त्याभोवती नगरपालिका कार्यालयाच्या वतीने संरक्षण भिंत घेवून जागेत उद्यान उभारणीसाठी तात्काळ प्रयत्न करावेत. अन्यथा सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी अशोक अंभोरे, मिलींद सावंत, ॲड.विष्णु ढोले, विनोद तरटे, के.व्ही.वाघमारे प्रा.के.डी.वाघमारे, ॲड.दिपक भुक्तर, सिद्धार्थ शिरसाठ, गौतम कनकुटे, सुबोध काकडे, विशाल धापसे, भारत काकडे, विजय खेबाळे, ॲड.अक्षय प्रधान, ॲड.गौतम इंगळे, ॲड.जितेश घायतडक, आनंद साळवे, अक्षय साळवे, गोवर्धन गायकवाड, विकास धापसे, राजेक कुरेशी, रोहन आकात, शिलवान साळवे, शुभम खंदारे आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!