Diwali : गीत रामायण, दिवाळी पहाट; सेलूमध्ये तीन दिवस सुरेल संगीताची बरसात
श्री केशवराज बाबासाहेब व साईबाबा मंदिरात कार्यक्रम
सेलू जि.परभणी : दिवाळीनिमित्त रविवार ते मंगळवार (१२ ते १४ नोव्हेंबर) सेलूतील रसिकांना विविध गायक कलावंतांच्या दिवाळी पहाट, गीत रामायण आदी संगीतमय कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. सेलू येथील श्रुती संगीत विद्यालयाच्या वतीने रविवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी साडेसात वाजता श्री केशवरराज बाबासाहेब महाराज मंदिरात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आहे. यामध्ये पं.शुभदा पराडकर यांच्या शिष्या सीमा उदय दडके यांचे शास्त्रीय गायन आहे. श्री साईबाबा मंदिर संस्थान व महेशनगर महिला मंडळाच्या वतीने सोमवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसात वाजता पंडित संजय जोशी यांचा ‘गीत रामायण’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. श्री साईबाबा मंदिर सभामंडपात हा कार्यक्रम आहे. मंगळवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने वर्षा जोशी व वैभव पांडे यांच्या ‘दिवाळी पहाट’ संगीत मैफिलचे आयोजन करण्यात आले आहे. श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात हा कार्यक्रम आहे. पूजा तोडकर, गजानन धुमाळ, शांतीभूषण देशपांडे, ललित चोबे, पंकज शिरभाते, राम हिवाळे, संदीप काळे यांचा सहभाग आहे. निवेदन श्रीकांत उमरीकर करतील. कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.