झेंडूची फुले अभियान : सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान; दिवाळीनिमित्त कार्यक्रम
कृषी विपणन पुरस्काराने सोमेश्वर गिराम यांचा सन्मान, पाच शेतकऱ्यांच्याही सत्कार
झेंडूची फुले अभियानांतर्गत रवळगाव येथील शेतीनिष्ठ शेतकरी सोमेश्वर गिराम यांना मान्यवरांच्या हस्ते कृषी विपणन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात तालुक्यातील विनोद निर्वळ ( हातनूर ), दत्ता गायके (साळेगाव), गोविंद गजमल (डासाळा), अशोक रोडगे (रवळगाव) , नानाभाऊ कोरडे (चिकलठाणा बुद्रुक) या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सेलू जि.परभणी : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या पुढाकाराने दिवाळी निमित्त रविवारी (१२ नोव्हेंबर) लोकमान्य टिळक पुतळा परिसरात झेंडूची फुले अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी प्रसिद्ध कीर्तनकार बाळू महाराज गिरगावकर म्हणाले की, ‘ जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा सन्मान झाला पाहिजे. बळीराजासह गोरगरीबांचीही दिवाळी गोड झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
झेंडूची फुले अभियानांतर्गत रवळगाव येथील शेतीनिष्ठ शेतकरी सोमेश्वर गिराम यांना मान्यवरांच्या हस्ते कृषी विपणन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात तालुक्यातील विनोद निर्वळ (हातनूर), दत्ता गायके (साळेगाव), गोविंद गजमल (डासाळा), अशोक रोडगे (रवळगाव) , नानाभाऊ कोरडे (चिकलठाणा बुद्रुक) या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, डॉ.सतीश मगर, मधुकर काष्टे, शरद ठाकर, सुरेश हिवाळे, बलभीम आवटे, भगवान गजमल, बंडू कदम, भगवान जाधव, राजेंद्र होलसुरे, डॉ.विलास मोरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी आभार मानले.
