गीत रामायण : सेलूतील रसिक, श्रोते आतूर; आज सायंकाळी कार्यक्रम
श्रीसाईबाबा मंदिर संस्थान आणि महेशनगर महिला मंडळाचा सांस्कृतिक उपक्रम
आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर व महान संगीतकार सुधीर फडके यांच्या प्रतिभेचा अनोखा आविष्कार म्हणजे गीत रामायण. सुधीर फडके यांनी महाराष्ट्रभर गीत रामायणाचे प्रयोग सादर करून रसिकांवर भूरळ घातली. नांदेडचे पंडित संजय जोशी आणि छत्रपती संभाजीनगरच्या वर्षा जोशी यांनी गायलेल्या गीत रामायणातील गीतांना ठिकठिकाणी रसिकांनी भरभरून दाद दिली आहे. हा कार्यक्रम रसिकांना पुन्हा एकदा जुन्या आठवणीत घेऊन जाणारा ठरला आहे, रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन असे आवाहन श्री साईबाबा मंदिर संस्थान आणि महेशनगर महिला मंडळ व संयोजकांनी केले आहे.
सेलू (जि.परभणी) : मराठी मनाचा ठाव घेणार्या आणि प्रभु श्रीरामचंद्राचे जीवनचरित्र उलगडून दाखविणाऱ्या ‘गीत रामायण’ कार्यक्रमातील गीतांची मोहिनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ रसिक मनांवर कायम आहे. नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला आज सोमवारी, १३ नोव्हेंबररोजी सायंकाळी साडेसात वाजता श्री साईबाबा मंदिर परिसरात गीत रामायण ऐकण्यासाठी सेलूतील रसिक, श्रोते आतूर आहेत.
नांदेडचे पंडित संजय जोशी आणि औरंगाबादच्या वर्षा जोशी यांनी गायलेल्या गीत रामायणातील गीतांना ठिकठिकाणी रसिकांनी भरभरून दाद दिली आहे. त्याच आवडीचा प्रत्यय सेलूतील रसिक अनुभवणार आहेत.दिवाळी पर्वानिमित्त श्रीसाईबाबा मंदिर संस्थान आणि महेशनगर महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर व महान संगीतकार सुधीर फडके यांच्या प्रतिभेचा अनोखा आविष्कार म्हणजे गीत रामायण. सुधीर फडके यांनी महाराष्ट्रभर गीत रामायणाचे प्रयोग सादर करून रसिकांवर भूरळ घातली. नांदेडचे पंडित संजय जोशी प्रस्तुत आयोजित गीत रामायणाच्या कार्यक्रमांना ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद आहे. हा कार्यक्रम रसिकांना पुन्हा एकदा जुन्या आठवणीत घेऊन जाणारा आहे. सहा दशकांहून अधिक काळ झाला असला तरीही तितकेच ताजेतवाने, रसरशीत वाटणारे आणि मानवी भावभावनांचे अदभूत दर्शन घडविणारे ‘गीत रामायण’ रसिक-श्रोत्यांना संजय जोशी आणि वर्षा जोशी यांच्या मधुर स्वरांतून ऐकायला,अनुभवायला मिळणार आहे. स्थानिक कलावंत अनिरुद्ध जोशी दोन भाव-भक्ती गीतेही या कार्यक्रमात सादर करणार आहेत. गायकांना डॉ.प्रमोद देशपांडे, तबल्यावर डॉ.जगदीश देशमुख, हार्मोनियम शांतीभूषण चारठाणकर, साईड रिदम ललित चोबे साथसंगत करणार आहेत. ध्वनी संयोजन गंगाधर कान्हेकर यांचे आहे. श्रीकांत उमरीकर यांच्या खुमासदार शैलीतील निवेदनाद्वारे ‘गीत रामायण’ रंगतदार ठरणार आहे. रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा मंदिर संस्थान आणि महेशनगर महिला मंडळ व संयोजकांनी केले आहे.
मंगळवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने वर्षा जोशी व वैभव पांडे यांच्या ‘दिवाळी पहाट’ संगीत मैफिलचे आयोजन करण्यात आले आहे. श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात हा कार्यक्रम आहे. पूजा तोडकर, गजानन धुमाळ, शांतीभूषण देशपांडे, ललित चोबे, पंकज शिरभाते, राम हिवाळे, संदीप काळे यांचा सहभाग आहे. निवेदन श्रीकांत उमरीकर करतील. कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.