दिवाळी पहाट : सीमा दडके यांच्या सुरेल स्वरांनी सेलूतील श्रोते मंत्रमुग्ध

दिवाळी पहाट : सीमा दडके यांच्या सुरेल स्वरांनी श्रोते मंत्रमुग्ध

सेलू्तील श्रुती संगीत विद्यालयाचा पुढाकार; रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती

पं.शुभदा पराडकर यांच्या शिष्या सीमा उदय दडके यांनी गायलेल्या एकाहून एक सरस शास्त्रीय बंदिशी, नाट्य गीत, भजन, अभंगांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.

दिवाळी पहाट : सीमा दडके यांच्या सुरेल स्वरांनी सेलूतील श्रोते मंत्रमुग्ध

दिवाळी पहाट : सीमा दडके यांच्या सुरेल स्वरांनी सेलूतील श्रोते मंत्रमुग्ध

सेलू जि.परभणी : येथील श्रुती संगीत विद्यालयाच्या वतीने दिवाळीनिमित्त रविवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी साडेसात वाजता श्री केशवरराज बाबासाहेब महाराज मंदिरात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम उत्साहात झाला. पं.शुभदा पराडकर यांच्या शिष्या सीमा उदय दडके यांनी गायलेल्या एकाहून एक सरस शास्त्रीय बंदिशी, नाट्य गीत, भजन , अभंगांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सीमा दडके यांनी ” रं गीली मीठी रैना ” ही विलंबित झुमरा तालात प्रभातकालीन बिभास रागामध्ये आग्रा-ग्वाल्हेर घराण्यातील पारंपरिक बंदिश सादर केली. त्यानंतर तीन तालातील द्रुत बंदिश भोर भये अब सकल जागे, भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले कन्नड भजन भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, निर्गुणी भजन सूर चराचर छायो, नाट्यगीत मुरलीधर शाम हे नंदलाला, संत तुकाराम महाराजांचा अभंग पद्मनाभा नारायणा नाट्य गीत श्रीरंगा कमलाकांता सादर केले. शिव के मन शरण हो जब प्राण तन से निकले या भैरवीने सांगता झाली तबल्यावर संकेत शार्दुल, हार्मोनियम शंतनु पाठक, तानपुरा ओवी दाडके, तालवाद्य गंगाधर कान्हेकर यांनी साथसंगत केली. निवेदन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले. ध्वनी संयोजन गंगाधर कान्हेकर यांचे होते.

कार्यक्रमाला गोविंदभाऊ जोशी, प्राचार्य विनायकराव कोठेकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, महेश खारकर, गंगाधर कान्हेकर, यशवंत चारठाणकर, किशोर जोशी, श्रीपाद कुलकर्णी, रवींद्र मुळावेकर, रवींद्र कुलकर्णी आदींसह रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

दिवाळी पहाट : सीमा दडके यांच्या सुरेल स्वरांनी सेलूतील श्रोते मंत्रमुग्ध

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!