अमृताहून गोड नाम तुझे देवा; सेलूमध्ये रंगली ‘दिवाळी पहाट’

अमृताहून गोड नाम तुझे देवा; सेलूमध्ये रंगली ‘दिवाळी पहाट’

अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा उपक्रम

गायकांनी सादर केलेल्या उठी उठी गोपाला, सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, ओ काला एक बांसुरीवाला, ऐरणीच्या देवा तुझ्या, आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, बाई मी विकत घेतला श्याम, कानडा राजा पंढरीचा, आली माझ्या घरी ही दिवाळी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अमृताहून गोड नाम तुझे देवा, आकाशी झेप घे रे पाखरा, माझी रेणुका माऊली, देव भावाचा भुकेला, केतकीच्या बनी, सत्यम् शिवम सुंदरम्, शुक्रतारा मंदवारा आदी एकाहून एक सरस गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.

अमृताहून गोड नाम तुझे देवा; सेलूमध्ये रंगली 'दिवाळी पहाट'

सेलू जि.परभणी : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने येथील कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कंठसाधना प्रस्तुत ‘दिवाळी पहाट’ संगीत मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गायकांना सादर केलेल्या भक्ती व भावगीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. मंगळवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात हा कार्यक्रम झाला. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, रामप्रसाद घोडके, प्रणिल गिल्डा, डॉ.सुनील कुलकर्णी, संयोजक अशोक काकडे, शिवनारायण मालाणी, महेश खारकर, अशोक फोफसे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वर्षा जोशी यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्यांनी मैफलीला सुरुवात झाली. वैभव पांडे यांच्या उठी उठी गोपाला भूपाळीने वातावरण प्रसन्न झाले. सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, ओ काला एक बांसुरीवाला, ऐरणीच्या देवा तुझ्या, आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे, बाई मी विकत घेतला श्याम, कानडा राजा पंढरीचा, आली माझ्या घरी ही दिवाळी, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अमृताहून गोड नाम तुझे देवा, आकाशी झेप घे रे पाखरा आदी भाव व भक्तीगीते सादर झाली. पूजा तोडकर-महाजन यांनी माझी रेणुका माऊली, देव भावाचा भुकेला, गायत्री कुलकर्णी यांनी केतकीच्या बनी हे गीत सादर केले. शुक्रतारा मंदवारा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तबल्यावर गजानन धुमाळ, हार्मोनियम शांतीभूषण देशपांडे, तालवाद्य ललित चोबे, पंकज शिरभाते, बासरी राम हिवाळे, संदीप काळे यांनी साथसंगत केली. निवेदन श्रीकांत उमरीकर यांनी केले. प्रास्ताविक संयोजक अशोक काकडे यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. बाबासाहेब हेलसकर यांनी आभार मानले. शीलाताई काकडे, रवी मुळावेकर, रघुनाथ बागल, सुनील पौळ, श्रीपाद कुलकर्णी, ॲड.अशोक फोफसे, संजय पिंपळगावकर, वरद काकडे आदींनी गायक कलावंतांचे स्वागत केले. संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

अमृताहून गोड नाम तुझे देवा; सेलूमध्ये रंगली 'दिवाळी पहाट'


अमृताहून गोड नाम तुझे देवा; सेलूमध्ये रंगली 'दिवाळी पहाट'

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!