सेलू पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान
माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांचा उपक्रम
सेलू जि.परभणी : दिवाळीच्या निमित्ताने सेलू नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांच्या हस्ते मंगळवारी, १४ नोव्हेंबररोजी यथोचित सन्मान करण्यात आला. नगरपालिकेच्या स्वच्छता विभाग परिसरात हा कार्यक्रम झाला. महिला कर्मचार्यांना साडी व फराळाचे पदार्थ, तर पुरुष कर्मचाऱ्यांना रुमाल, टोपी व फराळाचे पदार्थ वाटप करण्यात आले. या वेळी विनोद तरटे, नृसिंह हरणे, योगेश कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. नागरिकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी हातभार लावतात. सणासुदीतही सुटी न घेता परिसर स्वच्छता ठेवतात, असे आडळकर यांनी नमूद करून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.