BJP : भाजपाच्या विजयाचा सेलूमध्ये आनंदोत्सव
सेलू शहरात ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी, एकमेकांना पेढे, लाडू भरविले
सेलू जि.परभणी : सेलूतील तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश निवडणुकीतील विजयाचा जल्लोष रविवारी साजरा केला. सेलू येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय, क्रांती चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ढोल ताशा आणि फटाके फोडण्यात आली. एकमेकांना लाडू, पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. या वेळी तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, गणेश काटकर, अशोक खताळ, भगवानसिंग राठोड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश काटकर, जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरुळ, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे भागवत दळवे, अशोक अंभोरे, कपिल फुलारी, बाळासाहेब काजळे, संदीप बोकन,चाफेकर वनिता, रूपालीताई ठाकूर, बबीता ठाकूर, अनिल पवार,भास्कर पडघन, पंजाबराव पौळ, प्रकाश शेरे, लहानाप्पा हरकळ,नवाडे आप्पा, राजू सोळंके, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, मेघना दीदी आप आगे बढो, हम आपके साथ है, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी विजय उत्सव साजरा केला.